उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन निर्मिती प्लांट कार्यानवीत झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल

पामुळे जिल्ह्यातील अन्य शासकीय, खासगी रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भात उपाय योजना सुरू असून रुग्णाने आणि त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.  जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लँट तात्काळ पूर्ण व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. याबाबत आवश्यक असणाऱ्या सर्व मंजुरी घेणे, प्लॅन चा सेटअप उभा करणे, याबाबत पाठपुरावा सुरू होता. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून योग्य त्या सूचना देऊन हा प्लँट कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 350 ते 400 कोरोना रुग्णांना आता पुरेसा ऑक्सिजन यातून मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयातील या प्रकल्पाची क्षमता दहा मेट्रिक टन असून रुग्णालयातच ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने जिल्ह्याच्या इतर उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होणार आहे. या शिवाय रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत असताना ऑक्सीजन सिलेंडर अथवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट गरजेचे असतात. त्यासाठीही पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तात्काळ खरेदी करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. लवकरच  ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णांच्या सेवेत उपलब्ध होतील. त्यामुळे  ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला यामुळे दिलासा  मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपाय योजनामध्ये चांगली भर पडली असून नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

 
Top