उस्मानाबाद / प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असताना दिलासादायक म्हणजे आज ७११ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज बुधवारी दिवसभरात नवे ६६७ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

आजही उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ३२८ रुग्ण आढळले असून  तुळजापूर तालुक्यात ६६, उमरगा ४९, कळंब ८३, लोहारा ५२, वाशी ४१,  भूम ३० तर परंडा  तालुक्यात १८ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३१,५२८ रुग्णांची नोंद झाली असून २४,८३० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या ५९१९ रुग्णांवर उपचार सुरु असून आजवर ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.  कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने जारी केलेल्या निर्बंधाचे पालन करुन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

 
Top