उमरगा / प्रतिनिधी- 

शहरातील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्रशालेने सलाम मुंबई फाउंडेशनच्या तंबाखू मुक्त शाळेचे नऊ निकष पूर्ण करत जिल्ह्यातील पहिलीच तंबाखूमुक्त शाळा होण्याचा मान मिळवला आहे.

शहरातील जिल्हा परिषद प्रशालेने गेले दोन महिन्यापासून मुख्याध्यापक पद्माकर मोरे, तंत्रस्नेही शिक्षक संजय रुपाजी यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. आय एस ओ मानांकन प्राप्त शाळा हि तंबाखू मुक्त करण्यासाठी माजी विद्यार्थी दंतरोग तज्ञ डॉ यतिराज बिराजदार यांनी प्रशालेत सर्व विद्यार्थ्यांची मुखतपासणी व जिल्हा परिषद प्रशालेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली होती. शालेय समितीच्या अध्यक्ष सौ शकुंतला मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत तंबाखू नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव हे समितीचे उपाध्यक्ष आहेत. आता जिप शाळेतील एकही शिक्षक तंबाखू खात नाहीत‌ या शैक्षणिक संस्थेच्या शंभर मीटर परिसरात असलेल्या भागात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यासाठी गेल्या महिनाभरापासून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामाचे स्लोगन तयार करत जिप शाळा व परिसरात वातावरण निर्मिती केली. तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा बरोबरच शाळेत तंबाखूमुक्त मॉनिटर्सची नेमणुक केले असून शिक्षकांमधून सोनाली मुसळे, संजय रुपाजी तर विद्यार्थ्यांमधून पायल काळे, यासीन खैराटे, आयान मुगले, नादिया शानेदिवान यांना तंबाखूमुक्त मॉनिटर्स म्हणून निवड करण्यात आलेले आहे. शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक बाबासाहेब जाधव, बशीर शेख, धनराज तेलंग, चंद्रशेखर पाटील, बलभीम चव्हाण, सदानंद कुंभार, सरिता उपासे, शिल्पा चंदनशिवे, ममता गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुक्यातील तंबाखू मुक्त जिप प्रशाला झाल्याचा यशासाठी तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, उपाध्यक्ष शंकर सुरवसे, अशोक पतगे, तज्ञ श्याम भोसले, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार  बिराजदार, शिक्षण विस्तार अधिकारी बी एस महाबोले, केंद्रप्रमुख शीला मुदगडे, जिप प्राथमिकचे मुख्याध्यापक बाबुराव पवार आदींनी प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.

 जिल्हा परिषद प्रशाला ही शाळा तंबाखू मुक्त झाली आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत या शैक्षणिक संस्था परिसरात शंभर यार्ड पर्यंत तंबाखू जन्य पदार्थाची विक्री व खरेदी करण्यास कायद्यातील कलम ६ अन्वये संपूर्ण शाळा व परिसरात प्रतिबंध असून उल्लंघन झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. 

- मुकुंद अघाव, पोलीस निरीक्षक


 
Top