तुळजापूर / प्रतिनिधी- 

भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी छाया खराटे, युवकपदी अतुल वाडकर तर प्रसिद्धी प्रमुखपदी संतोष क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी ९ जिल्हा उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ९ चिटणीस, ३१ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश असणारी भाजप ओबीसी मोर्चाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. दरम्यान वर्षानंतर भाजपच्या तुळजापूर तालुका कार्यकारिणीच्या निवडीला मुहूर्त लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी निवडीला अखेर मुहूर्त मिळाल्याचे दिसत आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी कार्यकारिणीची घोषणा केली. 

यावेळी सोशल मीडिया प्रमुखपदी अमोल गुड्ड, सहप्रमुखपदी अमोल हुबाले यांच्यासह ३१ कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्हा उपाध्यक्षामध्ये भास्कर बोंदर, ज्ञानेश्वर माळी, संदीप खराडे, नंदकुमार माळी, सतीश वैद्य, राम लवटे, दगडू तीगाडे, मनोज पवार, प्रभाकर सरख यांचा समावेश आहे. सरचिटणीस पदामध्ये प्रमोद बचाटे, अॅड. तानाजी उत्तरेश्वर, परशुराम देशमाने, चिटणीस साहेबराव पाडुळे, चंद्रकांत मासाळ, सिद्राम सोनटक्के, अनिल बंडगर, सावता माळी, पोपट राठोड, विजय महानूर, विवेकानंद मेलगीरी, तुकाराम माळी, तसेच ओबीसी मोर्चा उस्माना तालुकाध्यक्षपदी अनिल शिंदे, तुळजापूर फिरोज मुजावर, उमरगा पप्पू घोडके, कळंब हणमंत माने, भूम प्रवीण शेटे, परंडा तुकाराम हजारे, वाशी बालाजी माळी, लाेहारा सुधाकर दंडवते यांचा समावेश अाहे.

 
Top