उमरगा / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सुंदरवाडीच्या रहिवाशी व सद्या शहरात वास्तव्यास असलेल्या कु प्रियांका विवेकानंद जाधव हिने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतले जाणाऱ्या सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन करत जनरल कोट्यातून १६४ गुण प्राप्त करीत उत्तीर्ण झाली आहे.

शहरातील प्रियांका जाधव हिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भारत विद्यालयात झाले, त्यानंतर हैदराबाद येथील कनिष्ठ महाविद्यालयात उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात एम एस्सी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या झुलॉजी (लाईफ सायन्स) परीक्षेत जनरल कोट्यातून १६४ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले असून यापूर्वी गेट परीक्षाहि उत्तीर्ण झाली आहे. सद्या विद्यापीठात पीएचडीचे अध्यापन करीत आहे. कु प्रियांका जाधव हिच्या घवघवीत यशाबद्दल डॉ सुभाष वाघमोडे, तालुका इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ दिपा मोरे, प्राचार्य डॉ घनशाम जाधव, डॉ.संजय गुरव, सेवानिवृत्त प्रबंधक भालचंद्र जाधव प्रा डॉ संध्या डांगे, केंद्रप्रमुख संजय चालुक्य, मुख्याध्यापक पदमाकर मोरे, सह शिक्षक व्यंकट क्षिरसागर, प्रा सुधाकर पुजारी, अनिल वाघमारे, सुंदरवाडीचे सरपंच प्रदिप जाधव, भरत सगर, उमाकांत पाटील, राहुल पाटील व ग्रामस्थांनी अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


 
Top