उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

मा.शरदचंद्रजी पवार  यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या “मी पण रक्तदान केले” या मोहिमे नुसार रविवार दि.11.04.2021 रोजी सकाळी 9.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन रक्तदानाची सुरुवात सौ.अनुराधा पांडूरंग रोहिदास यांच्या रक्तदानाने करण्यात आली.

यावेळी  संजय निंबाळकर, संजय पाटील-दुधगांवकर, मसूद शेख, नंदकुमार गवारे,आयाज शेख, कादरखान पठाण, वाजीद पठाण, रणविर इंगळे, बाबा मुजावर, बिलाल तांबोळी, अनवर शेख, नितीन बागल, डॉ.तांबारे, गयास मुजावर, शेखर घोडके,मनिषाताई राखुंडे-पाटील, मृत्युंजय बनसोडे,अतुल आदमाने,ॲड सोनु पाटील, आफरोज पिरजादे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

 एकूण 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना सॅनिटायझर व माक्स देण्यात आले. जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या रक्तपेढी कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी रक्तसंकलनास मोलाचे सहकार्य केले.


 

 
Top