उस्मानाबाद / प्रतिनिधी -
तालुक्यातील वडगाव (सि) येथील श्रीमती शांताबाई गणपतराव कोरडे (85) यांचे काल बुधवार, 21 नोव्हेंबर रोजी रात्री सोलापूर येथे अल्पशा आचाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक विवाहित मुलगी, नातु, पणतु असा मोठा परिवार आहे. वडगावचे माजी सरपंच रमेश कोरडे व धाराशिवचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुरेश कोरडे यांच्या त्या मातोश्री होत. गावात त्या ’अक्का’ या नावाने सुपरिचीत होत्या.