उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद तिलोकचंद बेदमुथा ( 69 ) यांचे अल्पशा आजाराने हैद्राबाद येथे निधन झाले. 

मोतीचंद बेदमुथा उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसेच औषध विक्रेता संघटना, खते व बि-बियाणे विक्रेता संघटना आदी संघटनेवर त्यांनी विविध पदे भूषविली. 

महाराष्ट्र टाईम्स चे त्यांनी बरेच वर्ष पत्रकार म्हणून काम केले. दैनिक  समय सारथीचे ते संस्थापक संपादक होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, मुलगा, चार मुली, पुतणे, भाऊजय, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर हैद्राबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पु.वि.लोकराज्य परिवार व उस्मानाबाद जिल्हा मराठी पञकार संघ यांच्या तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली बेदमुथा परिवाराच्या दुखात सहभागी आहोत इश्वर त्याना दुख सहन करण्याची शक्ती देवो


 
Top