उमरगा  / प्रतिनिधी -

उमरगा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वरचेवर वाढतच आहे. उमरगा येथे मंगळवारी तब्बल ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू  झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे जनतेत घबराट निर्माण झाली आहे.

कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. रोज होणाऱ्या तपासणीमध्ये दररोज ५०-७० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयात व ८ हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमध्ये उपचार चालू आहेत. किमान ५३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जिल्हा उपरुग्णालयात ९४, सीसीसी इदगाह कोविड केअर २४, शेंडगे हॉस्पिटल २१, शिवाई हॉस्पिटल ३०, गजानन हॉस्पिटल ०३, विजय क्लिनिक १०, माऊली  हॉस्पिटल १३, मातृछाया हॉस्पिटल ०८, शिवाजी कॉलेज कोविड केअर सेंटर २३ व होम आयसोल्युशन ४४ रुग्ण आहेत. यातच मंगळवारी तब्बल ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू  झाला. यामध्ये जकापुर कॉलनी, मदनंद कॉलनी, काळे प्लॉट, कुन्हाळी, दाळिंब, एकुरगा २ अशा ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच जणावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले तर बुधवारी दोघावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, या घटनेने जनतेत दहशत पसरून घबराट निर्माण झाली आहे. उमरगा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कामाशिवाय कोणीही बाहेर पडु नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top