उमरगा /प्रतिनिधी- 

उमरगा शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने उमरगा पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या  नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन व नगर पालिका मिळून उमरगा शहरात बुधवार (दि.२१) रोजी रूट मार्च काढण्यात आला .

कोरोना संक्रमण वाढत असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. सॅनिटाझरचा वापर करावा, किराणा, भाजीपाला व फळविक्रेत्या सोबत खरेदी करताना शारीरिक अंतराचे पालन करावे. रस्त्यावर विनाकारण फिरू नये. कुठेही गर्दी करू नये. चौकात घोळक्याने बसू नये. लॉकडाऊनचे नाविन नियमावली नुसार सकाळी ७-११ या वेळेतच दुकाने उघडी ठेवावीत. या नियमाचे पालन न करणारे व्यापारी व नागरीकावर कडक दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे  यांनी दिले. यासह अन्य कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बाबत पोलिसांनी जनजागृती केली.

 
Top