तुळजापूर /प्रतिनिधी -
तालुक्यातील होर्टी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. लसीकरण करणाऱ्या नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच सुवर्णा गुंजोटे, उपसरपंच अशोक राजमाने, ग्रा.प.सदस्य संजय गुंजोटे, सोसायटीचे चेअरमन दत्ता राजमाने, माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले, अशोक पाटील, मधुकर गायकवाड, व्यास कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव, डॉ. ज्योती तीर्थ,सुपरवायझर साळुंखे, एन.एम. एम. टी.जाधव ,आशा कार्यकर्ती कलावती राजमाने उपस्थित होते.