तुळजापूर /प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील मोतीझरा वैकुंटधामात दोन दिवसात तेरा जणांनवर कोरोना निर्दशानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले असुन गेली दोन दिवसापासुन वैकुंटधामात अखंडीत जाळधुर निघत आहे.सध्या सर्वञ कोरोना सारीने मरण पावणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असुन कोरोना व सारी ने मयत झालेल्या मंडळीवर अंत्यसंस्कार करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन नगरपरिषद कर्मचारी अंत्यसंस्कार करता करता थकुन जात आहेत.
येथील स्मशान भूमित बुधवार दि. 21 रोजी सहा व गुरुवार दि. २२रोजी सात अशा कोरोनाबाधीत व सारी ने मेलेल्या तेरा मंडळीवर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार संस्कार केले.यातच त्यांचा दिवस जातच पुनश्च दोन मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी आल्याने नगरपरिषद कर्मचारी अंत्यसंस्कार करता करता वैतागून गेले अहेत.
ऐका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळपास दीड तास लागतो हा विधी करताना संपुर्ण मृतदेह जाळे पर्यत डोळ्यात तेल घालुन पाहावे लागत कोरोना बाधीत मयतावर अंत्यसंस्कार करणे अतिशय जिकरीचे असते. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना स्वताचीही काळजी घ्यावी लागते.