तुळजापूर / प्रतिनिधी

येथील डॉ.प्रवीण सुभाषराव रोचकरी (४५) यांचे हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी दुपारी  निधन झाले. त्यांच्या पश्चात डॉक्टर पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ , आई, वडील असा परिवार आहे. डॉ. रोचकरी हे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होते. तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांचे ते चुलतभाऊ होत. त्यांच्या निधनाने तुळजापूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 
Top