उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विनाकारण बाहेर फिरणा-यांची रॅपिड अॅंटिजेन टेस्ट करा, अशी मागणी उस्मानाबाद नगर परिषदेचे नगरसेवक युवराज नळे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोविड १९ ची लाट उसळली असून मोठ्या प्रमाणावर रुग्न सापडत आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले आहेत, मात्र तरीही विनाकारण बाहेर फिरणा-यांची संख्या कमी होत नाही. म्हणून विनाकारण बाहेर फिरणा-यांची सक्तीने रॅपिड अॅंटिजेन टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून बाहेर फिरणा-यांवर काही अंशी पायबंद बसू शकेल.

तरी या संदर्भात लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशा मागणीचा उल्लेख त्यंानी निवेदनात केला आहे. 

 
Top