तुळजापूर  / प्रतिनिधी- 

तालुक्यातील आपसिंगा येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात  बुधवार दि७  पासुन  कोविड १९ ची लस देण्याचा उपक्रम शुभारंभ पंचायत समिती सभापती शरद जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले 

गावचे सरपंच राजकुमार गोरे यांनी प्रथम लस देण्यात आली पहिल्या दिवशी शंभर जणांना लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ अंतर्गत आपसिंगा कामठा काञी येथे दर बुधवारी कोरोना 19ची लस देण्यात येणार आहे. तरी तिन्ही गावचा ग्रामस्थांनी  न भिता लस घ्यावी असे आवाहन यावेळी उपसभापती शरद जमदाडे यांनी केले.

यावेळी उपसरपंच दिपक सोनवणे   ग्रामविकास अधिकारी चैतन्य गोरे वैद्यकीय अधिकारी डाँ संपदा खोमणे पाटील आरोग्य अधिकारी डाँ सुरेश माळी अदि उपस्थितीत होते यावेळी ४५वर्ष वयोगटातील स्ञी पुरुषांना लसदेण्यात आली. या कामासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व्ही.के. शिंदे, एस.आर.घोडके,  एनएम क्षिरसागर, एसएच राठोड, एस.एफ पाटील आशा स्वयसेविका, रेखा सुरवसे, अन्नपुरूणा सोनवणे रेश्मा सय्यद अदिनी परिश्रम घेतले.


 
Top