उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हा विधिमंडळ यांचे वतीने विधिज्ञ, जिल्हा न्यायालयातील न्यायिक वर्ग, कर्मचारी यांचेसाठी कोविंड 19 प्रतिबंधित प्रतिबंधक लस लसीची सुरुवात आज करण्यात आली.शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे हे लसीकरण सुरू करण्यात आले याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री एम जी देशपांडे साहेब सत्र न्यायाधीश श्रीमती रॉय मॅडम जिल्हा विधी मंडळाचे अध्यक्ष  ॲड नितीन भोसले हे उपस्थित होते.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी माननीय कौस्तुभ दिवेगावकर व आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली हे लसीकरण चालू आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ डी के पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ वडगावे, लसीकरण कॉर्डिनेटर डॉ मिटकरी, आयुर्वेदिक महाविद्यालय लसीकरण अधिकारी डॉक्टर लिलके मॅडम यांचे सहकार्य लाभत आहे .

देशभरात लसीकरण सुरू असताना आणखी काही लोकांशी संदर्भात भीती आहे, ही भीती दूर व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे याकरिता जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांनी पुढाकार घेऊन ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे तरी जास्तीत जास्त विधिज्ञ कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले 

 या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष ॲड राम गरड, ॲड निलेश बारखेडे,ॲड अतुल देशमुख, ऍड  क्रांतिसिंह डेंगळे, ऍड प्रवीण शेटे, ऍड भाग्यश्री कदम, ऍड अरुणा गवई, एड आकांशा माने,एड अश्विनी सोनटक्के, एड पात्रुडकर, एड तानवडे ,एड पारवे ,एडवोकेट कुलकर्णी हे उपस्थित होते


 
Top