प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सीईओ विजयकुमार फड  यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी

परंडा / प्रतिनिधी : -

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण जाहीर झाले असून महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने तसा शासन निर्णय दि.७ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित केला आहे.

सदरील शासन निर्णयात जिल्हांतर्गत बदल्यांचे अनुषंगाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात येणा-या शाळांची परिशिष्ट-१ मध्ये नमुद असणा-या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची निकषांची पुर्तता होत असेल तर ती शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

परिशिष्ट-१मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध करतील.सदरिल समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष आहेत.

तेंव्हा निकषानुसार जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध करावी याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड  यांना व्हाटसप च्या माध्यमातून केले आहे.

अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी गठीत केलेल्या समितीने आपल्या स्तरावरून योग्य ती भूमिका बजावून उचित कार्यवाही अनुसरून अवघड क्षेत्राचे निकष पूर्ण करत असलेली जिल्ह्यातील कोणतीही शाळा अनावधानाने व चुकून राहू नये व कोणत्याही शाळेवर तसेच शाळेतील शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी व शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, सचिव दत्तात्रय राठोड, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन,उपाध्यक्ष हनुमंत माने, महिला आघाडी प्रमुख सुषमा सांगळे-वनवे,जिल्हा नेते संतूक कडमपल्ले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top