उमरगा/ प्रतिनिधी-

शहरातील काळे प्लॉट येथील मुळज रोडलगत  बुधवारी दि.21 रोजी पहाटेच्या वेळी तेथील नागरिकांना  दगडाने चेहरा विद्रुप केलेला मृतदेह नजरेस पडल्याने एकच खळबळ उडाली.या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला अडून तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेनंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षकानी घटनास्थळी भेट दिली तसेच श्वानपथकामार्फत आरोपीचा माग घेण्यात आला.

मयत आकाश अबाचणे याचा लहान भाऊ राजेंद्र दत्तात्रय अबाचणे वय-21रा काळे प्लॉट उमरगा याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,मयत आकाश हा मुळज रोड परिसरात हॉटेलचा व्यवसाय करीत होता.त्याच्या हॉटेलमध्ये आरोपी रोहित चुंगे व आकाश धोत्रे हे चहा पिऊन जात व पैसे देत नसत.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मयत आकाशचे हॉटेल बंद होते.मयत आकाश हा रोहित चुंगे व आकाश धोत्रे यांना उधारीचे पैसे मागत होता.तू आम्हाला पैसे कसे मागितले म्हणून या दोघा आरोपीनी त्यास शिवीगाळ केली होती तसेच 18 एप्रिल रोजी रात्री मयत आकाशच्या घरी येऊन आकाश,त्याची आई व भावास शिवीगाळ करीत मारहाण केली होती.यावेळी या दोन आरोपिसोबत व्यकंट धोत्रे सुद्धा होता.यावेळी घाबरून आकाश ने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती.मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मयत आकाश हा घरी जेवण करून रूमवर झोपण्यासाठी गेला होता.बुधवारी दि.21रोजी  सकाळी पहाटे फिर्यादी राजेंद्र यास त्याचा चुलत भाऊ कुमार आबाचणे याने मोबाईल वर तुझ्या भावाचा मुळजरोड जवळ पालिकेच्या दुकान गाळ्यासमोरील मोकळ्या जागेत दगडाने खून केल्याची माहिती दिली.तरी माझ्या भावाचा हॉटेलच्या उधारी मागण्याबरून आरोपी रोहित चुंगे,आकाश धोत्रे,व्यकंट धोत्रे,प्रशांत पुरातले सर्व रा.उमरगा व विकास जाधव रा.तुरोरी यांनी मिळून माझ्या भावाचा खून केला आहे.या फिर्यादीवरून उमरगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी व्यकंट धोत्रे,विकास जाधव व प्रशांत पुरातले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोहित चुंगे व आकाश धोत्रे हे दोन आरोपी फरार आहेत.पुढील तपास सहा.पो.नी.सिद्धेश्वर गोरे हे करीत आहेत.


 
Top