तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील होर्टी येथील श्रावण मारुती कांबळे यांच्या शेतात वीज पडुन दोन म्हशी मरण पावल्याची घटना रविवार दि.२५ रोजी  राञी ९ वाजता घडली .

या बाबतीत अधिक माहीती अशी की होर्टी (ता. तुळजापूर) शिवारात श्रावण मारुती कांबळे यांची अडीच एकर शेती गट नंबर १२८ मध्ये आहे. रविवारी राञी अचानक अवकाळी पावसास प्रारंभ होवुन वीज पडुन झाडाखाली बांधलेल्या दोन मुरा जातीचा म्हशी ठार झाल्या. यात कांबळे यांचे जवळपास एक लाख नव्वद हजाराचे नुकसान झाले आहे. 

 


 
Top