तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील काक्रंबा येथे कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोविडच्या उपाययोजन अंतर्गत सुक्ष्म जंतुनाशक औषध फवारणी करण्याची मागणी चार ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतला पञ देवुन केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गाव तिर्थक्षेञ तुळजापूर पासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे.येथे ग्रामपंचायत शाळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असुन येथे पंचक्रोषीतील १० ते १२ गावच्या ग्रामस्थांचा वावर आहे.
सध्या काक्रंबा येथे कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे तरी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे सुक्ष्म जंतुनाशकाची फवारणी करावी, कंन्टेनमेंट झोन निर्माण करावेत, तरी कोविड19च्या उपाययोजना न केल्यास ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य मनोज घोगरे, श्रीमंत देवगुंडे,कांताबाई ढेरे, निवृत्ती क्षिरसागर यांनी दिला आहे