उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संबंध महाराष्ट्र होरपळत असून, एप्रिल महिन्यात रुग्ण संख्येत अनपेक्षित वाढ झाली आहे. आजही उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडेसिविर, ऑक्सिजन व रुग्णांसाठी खाटांचा प्रचंड तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिविर तुटवड्याचे राजकारण हाेत असून, १ एप्रिलपासून वायल्सच्या वाटपाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली अाहे.

पत्रात म्हटले अाहे की, रेमडेसिविर औषधाच्या व्यवस्थापन व वितरणाचा विषय हा पूर्णत: राज्य सरकारच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येतो. जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्ण संख्येच्या प्रमाणात याचे वाटप अपेक्षित होते, याबाबत निर्णयही झाला होता. मात्र याची अंमलबजावणी केली जात नाही. राज्यातील सर्वच विभागात लोकसंख्येच्या प्रमाणात सारखीच परिस्थिती असताना औषधे व इतर संसाधनांचे असमान वितरण केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. १४ एप्रिल रोजी जालना जिल्ह्यात रेमडेसिविरच्या १० हजार वायल्स आल्या. परंतु त्यादिवशी उस्मानाबाद जिल्ह्यात एकही रेमडेसिविर आले नाही.


 
Top