कळंब  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्यभरातील कोविड कंत्राटी,हंगामी व रोजंदारी अधिकारी व कर्मचार्यांचे तीन दिवस “रेड अॅलर्ट आंदोलन” होणार.अशी माहिती  संतोष भांडे यांनी िदली.                                                                                    

आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोना ने या महाभयंकर साथरोगाची सुनामी आली आहे,लाखों नागरीकांना या या विषाणूचा संसर्ग झाला असून,या साथीने आता रौद्ररूप धारण करत राज्यतील दररोज शेकडों लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत,हजारों कुटूंबे रोजच उद्ध्वस्त होताना हतबल होवुन उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे.यात सर्वात मोठा आधार आहे तो महाराष्ट्रात कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांवर सुयोग्य उपचार व सेवा देणार्या डाॅक्टर,स्टाफनर्स,एएनएम,जीएनएम,टेक्निशीयन,औषध निर्माता,कक्ष सेवक,डेटा इंट्री आॅपरेटर,स्टोअर आॅफीसर,सफाई कामगार,अॅम्ब्युलंन्स ड्राईव्हर,सुरक्षा रक्षक आदी पदावर काम कर्मचार्यांचा,याच कर्मचार्यांच्या प्रचंड मेहनतीने मागील वेळी कोरोनाला पायबंध घालण्यात महाराष्ट्रात कांही अंशी यश आले होते,मात्र राज्य शासनाने कोरोना चा प्रभाव कमी होताच,महाराष्ट्र राज्यातील सुमारे दहा हजार कोरोना योद्ध्यांना कामावरुन कमी करत त्यांना कार्यमुक्त करुन राज्यभरातील सक्रीय कोविड केअर सेंटर्स बंद केले होते.त्यानंतर राज्यभरातील विवीध जिल्ह्यांसह आझाद मैदान,मुंबई येथे संतोष भांडे यांचे नेतृत्वात हजारों कोरोना योद्ध्यांनी धरणे आंदोलन केले होते,सदर आंदोलना दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर संक्रमण होण्याची शक्यता असताना कोविड केअर सेंटर्स बंद करून कोरोना योद्ध्यांना कार्यमुक्त करणे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून धोक्याचे ठरणार असल्याचा ईशाराही यावेळी महामारी योद्धा संघर्ष समितीचे प्रमुख श्री.संतोष भांडे यांनी दिला होता.

यानंतर शासनाला जाग येवून राज्यातील कांही कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले होते.मात्र जवळ पास तीन महीने हजारो कोविड केअर सेंटर्स बंद करून,सर्व कोविड नियंत्रकांनी व शासनाच्या दुर्लक्षाने पुन्हा कोरोनाच्या मोठ्या धोक्याचा सामना जनतेला आता करावा लागत असून,रोजचं राज्यात पेटणार्या हजारों सरणांना जबाबदार कोण? बेफीकीर जनता कि शासन? असे प्रश्न आता निर्माण होवू लागले असून,यातच स्वतःचे व आपल्या कुटूंबीयांचे जीव धोक्यात घालून कोरोना रोगाचा मुकाबला करत,अल्प मानधनावर रूग्णसेवा करून,लक्षावधी नागरीकांचे प्राणांचे रक्षण करणार्या कोरोना योद्ध्यांनी,आपल्या मागण्यांकडे शासन व जनतेचे लक्ष वेधण्याकरीता दिनांक २६/०४/२०२१ ते २९/०४/२०२१ पर्यंन्त “रेड अॅलर्ट आंदोलन” राज्यभरातील सर्व कोविड केअर सेंटर्स,हाॅस्पिटले,जिल्हा,उपजिल्हा,प्राथमिक आरोग्य केंन्द्र,उपकेंन्द्र आदी सर्व ठिकाणी ज्या-ज्या ठिकाणी कोरोना योद्धे काम करतात अशा महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी हे आंदोलन होणार असल्याचे महामारी योद्धा संघर्ष समितीचे प्रमुख संतोष चत्रभुज भांडे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,विरोधीपक्ष नेते आदींना पाठवलेल्या निवेदनात नमुद केले आहे.तसेच हे आंदोलन सर्व कोरोना योद्धे आपल्या मनगटावर,डोक्यावर,किंवा खिश्याला लाल पट्टी किंवा कपडा बांधून करणार असून यादरम्यान कोरोना योद्धे आपली रूग्णसेवा चालूच ठेवणार आहेत.तसेच १) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियुक्त केलेले विवीध आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांस यानंतर नियुक्ती आदेश देताना कमीत-कमी ११ अकरा महीन्यांचा देवून,नियमीत करणे बाबतची कार्यवाही अनुसरण्यात यावी.(२)महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने,आरोग्य विभागात नुतन करण्यात येणारी आरोग्य भरती ही वरील कंत्राटी,हंगामी व रोजंदारी कर्मचार्यांच्या,योग्य त्या पदास आवश्यक असणार्या विहीत शैक्षणीक अर्हते प्रमाणे खाते अंतर्गत परीक्षेच्या माध्यमातूनच भरण्यात याव्यात.(३)वरील प्रमाणे नमूद सर्व कर्मचार्यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियान,राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान,तथा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कोविड,नाॅनकोविड,व तत्सम विभागात समावेश करावा.(४)सर्व अधिकारी व कर्मचार्यांना पन्नास५०लाखांचे विमा संरक्षण द्यावे.(५) कर्मचार्यांच्या सर्व कुटूंबीयांचे वयाच्या अटीं शिवाय लसीकरण करावे.(६)आयुष विभागाच्या वेतन विषयक शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी.(७)सर्व अधिकारी व कर्मचार्यांना राज्य शासनाच्या नियमीत कर्मचार्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी.(८)राज्यातील सर्व आरोग्य केंन्द्रे व दवाखान्यात कायम स्वरूपी कोविड विभाग चालू करावा.(९)आरोग्य कर्मचार्यांकरीता रेमडिसीविर इंजेक्शन राखीव ठेवण्यात यावे.(१०)विष्णता विरोधक पीपीई किट तात्काळ उपलब्ध करून द्यावेत.(११)प्रत्येक कोविड सेंटरवर सुरक्षा रक्षक तैनात असावेत.(१२)कोविड सेंन्टर येथे कर्तव्यावर असणार्या अधिकारी व कर्मचार्यांना भोजनाची सोय उपलब्ध करून द्यावी.या सर्व मागण्यां तात्काळ मान्य करून,त्यांची अंमलबजावणी येत्या पंधरा दिवसांत करावी याकरीता संपुर्ण राज्यभर हे “रेड अॅलर्ट आंदोलन” होणार असल्याचे निवेदनात म्हटले असून त्यावर अध्यक्ष व प्रमुख संतोष भांडे यांची स्वाक्षरी आहे.

 
Top