कळबं ( शिवप्रसाद बियाणी )       

कळंब तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कळंब तालुक्यात आजवर कोरोणा बाधितांची संख्या २९५९ वर पोहोचली तर २६१२  रूग्णानी कोरोणावर मात करून सुखरूप घरी गेले  आहेत.  अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली आहे. 

कळंब तालुक्यात कोरणाचा कहर वाढत चाललेला आहे काही उपाय योजना प्रशासनाने केल्या तरी कोरणा कमी होण्याचे नाव घेतच नाही.प्रशासनाने आनखि कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. तालुक्यांमध्ये आजवर बाधितांची संख्या ही २९५९  वर पोहोचली आहे तर बरे होणे रुग्णांचे प्रमाण २६१२ आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी ३०५ रुग्ण हे वेगवेगळ्या कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.  तर आजवर मरण पावल्याची संख्याही तालुक्यामध्ये ५० वर पोहोचली आहे.  शहरात सध्या उपजिल्हा रुग्णालय मध्ये १८  आयटीआय होस्टेलवर ८५  होम आयसोलेशन रुग्ण २०२  आहेत. असे एकूण २०२ रुग्ण उपचार व डॉ. च्या निगराणीखाली सध्या आहेत.  आजवर एकूण तपासण्या आरटीपीसीआर ७,६९० केल्या  त्यापैकी प्राप्त अहवाल ७,६३० प्रलंबित अहवाल ६० आहेत, आजवर तपासणी पैकी निगेटिव आलेल्यांची संख्या ६,२५८   तर  पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३७२   आहे.  एकूण रॅपिडअँटीजन टेस्टमध्ये तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या १०,३०९ त्यापैकी निगेटिव रुग्णांची संख्या ८,६२०  तर बाधित रुग्णांची संख्या १६८९  आहे . उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या पहता २७ हजार ०८०  त्यापैकी २१ हजार २६७ रुग्णही बरे होऊन घरी गेले आहेत तर कोरणा मुळे मृत्यू पावल्याची संख्या ही ६५७   वर पोहोचली आहे जिल्ह्यात  ५१५६  रूग्ण हे  वेगवेगळ्या ठिकाणी सध्या उपचार घेत आहेत.

         येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना व नर्स यांना उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी चालवुन शहराबाहेर असलेले कोरणा सेंटर चालवताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे . ही कसरत थांबवण्यासाठी कोविड सेंटरला नवीन डॉक्टरांची टीम तात्काळ नेमावी अशी मागणी कर्मचाऱ्यातून  जोर धरत आहे.   

 तर उपजिल्हा रुग्णालयात तर रोज जवळपास तीनशे ते चारशे च्या जवळपास ओपीडी रुग्ण उपचारासाठी येतात ,त्यातच गरोदर मातांची तपासणी, शस्त्रक्रिया, लसीकरण मोहीम, डिलीव्हरीसाठी रुग्ण दाखल होता .अशा अनेक रुग्ण वेगवेगळ्या उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होतात यासाठी अहोरात्र सेवेसाठी डॉ. शोभा लोखंडे, डॉ. सुधीर आवटे, डॉ. निलेश भालेराव ,डॉ. अपर्णा मुचाटे, डॉ. स्वप्नील शिंदे, डॉ. शरद दशरथ ,डॉ. भक्ती गीते, डॉ. योगिनी चौधरी ,डॉ. मीरा कस्तुरे ,डॉ. श्याम चौधरी , प्रगती भंडारे, सचिन ठाकूर आदी कर्मचारी अहोरात्र यासाठी परिश्रम घेत आहेत.

 
Top