उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बालाजी अमाईन्सकडून दोन ऑक्सिजन थेरेपी ( हाय फ्लो ) मशीन व दोन पाय पॅप ( सिमी व्हेन्टीलेटर ) मशीन जिल्हाधिकारी कार्यालयास सुपुर्द करण्यात आल्या. जिल्हाधिका - यांच्या विनंतीला प्रतिसाद उस्मानाबाद जिल्हयात वाढत असलेले कोरोना रूग्ण आणि होणारे मृत्यू यावर नियंत्रण आणण्याकरीता जिल्हाधिकारी श्री . कौस्तुभ दिवेगावकर यांनी बालाजी अमाईन्सकडे ऑक्सिजन हाय फ्लो मशीन व बाय पॅप मशीन ची मागणी केली होती त्यांच्या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री.डी.राम रेडडी यांनी उस्मानाबाद जिल्हयाकरीता दोन हाय फ्लो ऑक्सिजन थेरेपी मशीन व दोन बाय पॅप मशीन असे चार मशीन उपलब्ध करून भेट दिल्या .

बालाजी अमाईन्सचे प्रतिनिधी दत्तप्रसाद सांजेकर यांनी उस्मानाबाद निवासी उपजिल्हाधिकारी श्री.शिवकुमार स्वामी यांचे कडे दोन हाय फ्लो ऑक्सिजन मशीन व दोन बाय पॉप मशीन सुपूर्त केली निवासी उपजिल्हाधिकारी श्री शिवकुमार स्वामी यांनी याप्रसंगी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे व व्यवस्थापकिय संचालक श्री डी.राम रेडडी यांचे आभार मानले . कोरोनाचे गंभीर रूग्ण व श्वसना संबंधी त्रास होत असलेल्या रूग्णांना या ऑक्सिजन हाय फ्लो व बाय पॅप मशीन मुळे मदत होणार आहे .जिल्हाधिकारी व संपुर्ण प्रशासनाच्यावतीने जिल्हयातील रूग्णसंख्या व मृत्यूदर याचे प्रमाण घटविण्याचे कार्य करत आहेत त्यास मदत होणार आहे . यातून जिल्हयातील मृत्यूदर कमी होईल अशी अपेक्षा आहे .  

 
Top