तुळजापूर /प्रतिनिधी  -

 माझे कुंटुंब माझी जबाबदारी  उपक्रम अंतर्गत माझा प्रभाग माझी जबाबदारी प्रेरणेने मी प्रभाग क्रमांक चार मधील अठरा वर्षा वरील नागरिकांना लस देण्याची इच्छा आहे. त्यासाठी या लसीचा पन्नास टक्के खर्च मी स्वखुशीने करण्यास तयार आहे.

तरी शासनाने माझ्या  प्रभागातील नागरिकांना लस उपलब्ध  करुन द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी जिल्हाधिकारी यांना पञ देवुन केली आहे.

डाँक्टर मंडळीच्या सल्याने शासनाच्या सर्व नियम अटी नुसार माझ्या प्रभाग क्रमांक चार मधील सर्वांना माजी मंञी आ. मधुकरराव चव्हाण यांच्या प्रेरणेने सुनिल मधुकरराव चव्हाण विचार मंच माध्यमातून नागरिकांना लस देवुन शासनाला सहकार्य करण्याचा माझा मानस आहे. 

हा उपक्रम माझ्या प्रभागात राबविणार असुन यामुळे सरकारी रुग्णालयात होणारी गर्दी कमी होणार आहे.तरी लसीकरणासाठी स्वखर्चाने  पन्नास टक्के व अर्धा पन्नास टक्के लसीकरण खर्च शासनाने करुन मला लसीकरण शिबीर घेण्यासाठी लस उपलब्ध करुन परवानगी द्यावी ,अशी मागणी प्रभाग क्रमांक चारचे काँग्रेसचे नगरसेवक सुनिल रोचकरी  यांनी केली आहे.

 
Top