उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

  उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील सुरेखा ज्ञानोबा गरड ही पन्नास वर्षीय महिला शेतकरी वीज कोसळून दगावली आहे. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेतातील झाडाच्या आडोश्याला थांबलेल्या सुरेखा गरड यांच्या अंगावर वीज कोसळली आणि जागेवरच त्या गतप्राण झाल्या.

उस्मानाबादसह परिसरात रविवारी दुपारी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. त्यातच विजांचा गडगडाट सुरू झाला. शेतात कांदा कापणीचे काम करीत असलेल्या सुरेखा गरड यांनी शेतातील वडाच्या झाडाखाली आडोश्याचा आधार घेतला. झाडावर वीज कोसळल्याने सुरेखा गरड अक्षरशः होरपळून निघाल्या. त्यांच्या सोबत असलेल्या सविता तुकाराम गरड यांनाही त्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.


 
Top