उस्मानाबाद /प्रतिनिधी-

महामानव,भारतरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य ,महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे सावट आहे.त्यानुशंगाने महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी उस्मानाबाद येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

यावेळी रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा मनिषाताई राखुंडे,नगरसेवक प्रदीप मुंडे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा सुनिताताई जाधव,आळणीचे सरपंच प्रमोद काका वीर,प्रवीणदादा तांबे,अमोल सुरवसे,प्रा.तुषार वाघमारे,संतोष पवार,बालाजी भातलंवडे,राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे नारायण तुरूप सर, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष सौरभ देशमुख,अॕड योगेश सोन्ने पाटील,फायाज शेख,तेरखेडा ग्रामपंचायत सदस्य विकी चव्हाण,रामेश्वर पवार,दिनकर वीर,अमोल वीर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित व भेटी देऊन गेले.

डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,सध्या राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्याला प्रतिसाद म्हणून महामानव,भारतरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य ,महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन केले.अजुनही गरज भासल्यास रक्तदान शिबीरे आयोजित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 
Top