उस्मानाबाद / प्रतिनिधी :- 

तालुक्यातील शिंगोली , जहागीरदार वाडी , जहागीरदार वाडी तांडा , कामठा/ दीपक नगर या ठिकाणी  नॅशनल सीडस कॉर्पोरेशन लि . पूणे यांच्या कडुन जिल्हा परिषद शाळेसाठी  संस्थेमार्फत शिंगोली साठी 30 , जहागीरदारवाडी - 30 , जहागीरदारवाडी तांडा - 15 , दीपक नगर/ कामठा - 25 असे एकुण 100 लोखंडी बेंन्च नॅशनल सीडस कॉर्पोरेशन लि . पूणे यांच्या मार्फत मिळाले आहेत .

 आदर्श सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राज शशिकांत राठोड यांच्या प्रयत्नामुळे व नॅशनल सीडस कॉर्पोरेशन लि. च्या सहकार्य मुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठे सहकार्य झाले आहे.

बेंन्च शाळेच्या ताब्यात घेताना मुख्याध्यापक कांबळे सर , शेषेराव चव्हाण सर , सुनील चव्हाण, शिक्षक शिंदे सर ,अर्जुन रणखांब, ग्रा स. नानासाहेब पवार ,राज शशिकांत राठोड अमोल रणखांब, अनंता राठोड उपस्थित होते . शाळेच्या वतिने 

राज शशिकांत राठोड यांनी बेंन्च मिळवण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल व नॅशनल सीडस कॉर्पोरेशन लि . पूणे यांनी दिल्या बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

 
Top