परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे यांनी भाजपाच्या परंडा तालुक्याच्या मोर्चा व आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्या निवड जाहीर केली असुन आघाडी व मोर्याचे नवनियुक्त अध्यक्ष प्रमाणे आहेत.
भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजित धन्यकुमार काकडे (दहिटणा), महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियंका निशीकांत क्षिरसागर (आनाळा), किसान मार्चा अध्यक्ष श्री. अर्जुन दत्तात्रय कोलते (रोहकल), ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. तुकाराम बिरमल हजारे (कौडगाव), अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. संतोष मधुकर शिंदे (वाटेफळ), अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष फारूख बाशामिया मुलाणी (आलेश्वर), विधी आघाडी अध्यक्ष ॲड. लक्ष्मण सदाशिव कोकाटे (कुंभेजा), भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष श्री. राहुल आप्पासाहेब खोत (ताकमोडवाडी), उद्योग आघाडी अध्यक्ष - श्री. नागेश सुनिल गर्जे (सोनारी), दिव्यांग आघाडी अध्यक्ष श्री. तानाजी दत्तात्रय घोडके, सोशल मिडीया अध्यक्ष तुषार सिध्देश्वर नेटके (भोंजा)
या नवनियुक्त अध्यक्षांचे भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.



