उस्मानाबाद / प्रतिनिधी

 उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त  सत्यनारायण सिताराम दंडनाईक (वय 81) यांचे सोमवारी पहाटे  खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा  शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच राज्य निवड मंडळाचे सदस्य म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. धाराशिव कुकुट पालन संस्थेचे ते मुख्य प्रवर्तक होते. सहकारी  राज्याचे ज्येष्ठ माजी मंत्री तथा माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते. यशवंत पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंडनाईक यांचे ते वडील होते. 

 
Top