उस्मानाबाद / प्रतिनिधी

भाई उध्दवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी पतसंस्था म. उस्मानाबादच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविडसाठी 51000 रुपयाचा धनादेश देण्यात आला.

 पतसंस्था नफ्यातून सामाजिक कार्यासाठी दरवर्षी आर्थिक मदत करते.त्याचाच एक भाग म्हणून कोविड या नैसर्गिक आपत्ती संकटाशी मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

   गेल्यावर्षी करोना तपासणी यंत्र खरेदीसाठीसुध्दा आर्थिक मदत करण्यात आली होती. पतसंस्थेचा सभासद  जर करोनाग्रस्त झाला तर त्यास एक लाख रुपयांपर्यंत विनाकागदपत्र तात्काळ रक्कम उपलब्ध करून दिली जाईल.

 
Top