तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील नळदुर्ग रस्तावर नगरपरिषदच्या  असणाऱ्या कचराडेपोत दोन अर्धवट अवस्थेतील अभ्रक बुधवार दि ३१रोजी सकाळी अकराचा सुमारास  आढळल्याने खळबळ उडाली आहे, 

दोन अभ्रक आढळताच पो नि दांडे मुख्याधिकारी अशिष लोकरे उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली .

 या प्रकरणी अधिक माहीती अशी की, मंगळवार दि.30 रोजी अभ्रक असल्याची चर्चा असल्याने पोलिस व नगरपरिषद अधिकारी यांनी जावुन पाहणी केली पण काहीही आढळले नाही  बुधवार दि.31 रोजी सकाळी कचरा गोळा करणाऱ्यांना हे दोन अर्धवट अवस्थेतील  अभ्रक दिसले त्यांनी ही माहीती नगरपरिषदला देताच नगरपरिषदने ही माहीती पोलिसांना दिली नंतर सपोनी दांडे, मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली असता एक अर्धवट अवस्थेतील डोके नसलेले दुसरे डोक्याला गाठ असलेले अंदाजे अंदाजे पंधरा ते वीस आठवड्याचे अभ्रक आढळले असता स्थळपंचनामा करुन ते पोलिसांनी ताब्यात घेतले.

फाँरैन्सिक अहवाला नंतर प्रकरणाचे गुढ उलगडणार !

सदरील अभ्रकाचे पोस्ट मार्टम  केल्यानंतर ते फाँरेंन्सिक लँब ला पाठवल्यानंतर त्याचा अहावाल आला का या प्रकरणा बाबतीत माहीती स्पष्ट होणार आहे,

अंपग अर्धवट जन्मला आले की, सदरील अभ्रकाचे अँबार्शन करता येते तो प्रकार यातीलच असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे पण हे अर्धवट अवस्थेतील अभ्रक बीड येथील चंपावती संस्थेकडे जमा करावे लागते पण असे अर्धवट अभ्रक सापडल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.

 
Top