उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शेतकऱ्यांना वेठीस धरून महावितरणाच्या माध्यमातून राज्य सरकार वीज बिलाची वसुली सक्तीने करत आहे. सब स्टेशन/रोहित्रे बंद करून पूर्णच वीज पुरवठा खंडित केला जात आहे. गावेच्या गावे बंद केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वीज देयके भरली आहेत त्यांना देखील वीज पुरवठा होत नाही. एकाही शेतकऱ्याने देयक भरले असेल तर त्याची विद्युत जोडणी करून वीज पुरवठा करणे कायद्याने बंधनकारक आहे. भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे व याला मोठ्या प्रमाणात महावितरणचे नियम बाह्य व बेजवाबदार कृती कारणीभूत आहे. या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या विरोधात दावे दाखल करावे लागतील व यासाठी भारतीय जनता पार्टी कडून संपुर्ण सहकार्य करण्यात येईल.

 महावितरणाकडून कधीही शेतकर्‍यांना २४ तास वीज दिली जात नाही, ऐन हंगामात रात्री-बेरात्री जास्तीत जास्त ८ तास तीही पुरेशा दाबाने वीज दिली जात नाही.  रोहित्रे जळाल्यास शेतकऱ्यांना स्वखर्चाने त्याची ने-आण करावी लागते, काही बिघाड झाल्यास दुरुस्ती देखील महिना- दोन महिने होत नाही. अशा प्रकारची सुमार सेवा देणाऱ्या महावितरणला ग्राहकांना वेठीस धरण्याचा अधिकारच नाही. परंतु महाविकास आघाडीचे हे मुर्दाड सरकार रझाकारांसारखे वागत आहे.

 भाजपला घाबरून सरकारने केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत सक्तीच्या वीज बिल वसुलीला स्थगिती दिली. अधिवेशन संपताच नव्या जोमाने वसुली मोहीम सुरू आहे. अशी मोहीम या सरकारने या आधी कोणत्याही जनहिताच्या कामासाठी राबविली नाही. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक ३० मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व महावितरण कार्यालये व सब स्टेशन समोर वीज बिलाची होळी करण्यात आली. यावरच न थांबता या आंदोलनाची तीव्रता अधिक व्यापक करण्यासाठी तसेच सरकारला जागे करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यलयासमोर वीज बिलाची प्रतीकात्मक होळी करून या महावसुली सरकारचा निषेध करत ही सक्तीची वसुली त्वरित थांबवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा.

 सक्तीच्या वीज बिल वसुली मोहिमेअंतर्गत महावितरणने नियम बाह्य रित्या सब स्टेशन व फिडर बंद केल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी महावितरणच्या विरोधात आपण ग्राहक मंचात दावे दाखल करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी भाजपचे पूर्ण सहकार्य राहणार आहे. त्यामुळे सब स्टेशन/ फिडर/रोहित्रे बंद केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे भाजपा अध्यक्ष यांना त्वरित संपर्क करून माहिती द्यावी. तसेच ८८८८६२७७७७ या व्हाट्सअॅप क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

भाजपा तालुकाध्यक्षांचे नाव व नंबर

उस्मानाबाद- श्री.राजाभाऊ पाटील - ९४०४६७६५३२

तुळजापूर- श्री.संतोष बोबडे- ९८५०२५७७७७

कळंब- श्री.अजित पिंगळे- ९४२२४६६६७८

भूम- श्री.महादेव वडेकर- ९४२३३४०४८२

परांडा- श्री.राजकुमार पाटील- ९४२२९६३११८

वाशी- श्री.सचिन इंगोले - ८८८८५२३५०१

लोहारा- श्री.राजेंद्र पाटील - ७८७५१०५९०४

उमरगा- श्री.कैलास शिंदे- ९४२२९२८८९८

 
Top