उस्मानाबाद - रमाई आवास योजनेचा हप्ता देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना कळंब येथिल गृह निर्माण अभियंत्याला व खासगी व्यक्तीला प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार  यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर झाले होते त्यांच्या घराच्या बेसमेंट लेवल पर्येंत झालेल्या बांधकामच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल व तिसऱ्या हप्त्याचे बिल काढण्याच्या कामासाठी आरोपी शशिकांत अंगद टेकाळे,  कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता,बांधकाम विभाग,पंचायत समिती, कळंब, ज़िल्हा उस्मानाबाद यांनी आज दिनांक 31.03.2021 रोजी पंचांसमक्ष 2000/- रुपयेची लाचेची मागणी करून  आजच खाजगी इसम राहुल प्रताप राणे, राहणार गणेश नगर, कळंब ता. कळंब, ज़िल्हा उस्मानाबाद यांचे मार्फतीने स्विकारले.याबाबत  पो स्टे कळंब , ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद  यांचे  मार्गदर्शनाखाली

प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांनी केली.

याकामी त्यांना पोलीस अंमलदार  शिवाजी सर्जे,इफ्तेकर शेख,  विष्णू बेळे, विशाल डोके , सिद्धेश्वर तावसकर, चालक तत्तात्रय करडे यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.9527943100, 02472 222879) 

 यांनी केले आहे.

 
Top