उस्मानाबाद / प्रतिनिधी -  

राज्यातील अनुसूचित जाती/नवबौध्द आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे. या योजनांतर्गत सुक्ष्म सिंचन संच या घटकासाठी देण्यात येतो. हे अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेतून देण्यात येतो. तर अनुदानास पुरक अनुदान देऊन शेतक-यांना एकूण खर्चाच्या 90 टक्के मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. अशी माहिती पुणे येथील कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली आहे.

  या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पुरक अनुदान उपलब्धतेबाबत मार्गदर्शक तत्वे अशी आहेत.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना:- या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-या आणि किमान 0.20 हे. क्षेत्र असणा-या अनुसुचित जाती/नवबौध्द प्रवर्गातील या योजनेच्या लाभार्थ्यांना सुक्ष्म सिंचन संचाकरिता मंजूर मापदंडानुसार येणा-या खर्चापेकी कमाल 55 टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -प्रती थेंब अधिक पीक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या तरतुदीतून 35 टक्के अनुदान (ठिबक सिंचन संचासाठी कमाल 50 हजार रुपये आणि  तुषार सिंचन संचासाठी कमाल 25 हजार रुपये मर्यादेपर्यंत) याप्रकारे या दोन योजनांच्या माध्यमातून 90 टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.या योजनेंतर्गत फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतक-यांना लाभ देय आहे.

 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना(क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) :- 2019-20 पासून जे अनुसुचित जमातीचे अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतकरी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत पात्र नाहीत, परंतु त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल अशा लाभार्थ्यांना सुक्ष्म सिंचन संचाकरिता मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल 55 टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेतून आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) तरतुदीतून 35 टक्के अनुदान ( ठिबक सिंचन संचासाठी कमाल 50 हजार रुपये आणि तुषार सिंचन संचासाठी कमाल 25 हजार रुपये मर्यादेपर्यंत ) अशाप्रकारे दोन्ही योजनांच्या माध्यमातून 90 टक्के अनुदान निधीच्या उपलब्‍धतेनुसार अभिसरणाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येते.

 अनुसूचित जमातीचे इतर शेतकरी (अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी वगळता) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पात्र नाहीत परंतु त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल, अशा लाभार्थ्यांना सुक्ष्म सिंचन संचाकरिता मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल 45 टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान ( ठिबक सिंचन संचासाठी कमाल 50 हजार रुपये आणि तुषार सिंचन संचासाठी कमाल 25 हजार रुपये मर्यादेपर्यंत ) अशाप्रकारे दोन्ही योजनांच्या माध्यमातून 90 टक्के अनुदान निधीच्या उपलब्‍धतेनुसार अभिसरणाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येते.

 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील) या योजनेअंतर्गत सरसकट सर्व लाभार्थ्यांना दोन्ही योजनांच्या माध्यमातून 90 टक्के अनुदान निधीच्या उपलब्धतेनुसार अभिसरणाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील ) या योजनेतून सुक्ष्म सिंचन या बाबीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक या योजनेमधून लाभ घेणे अपेक्षित असून या योजनेमधून फक्त टॉप अप पुरक अनुदान देण्यात येते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहित करण्यात आलेली दीड लाख रुपयापर्यंतची वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट केवळ सुक्ष्म सिंचन या बाबीसाठी रद्द करण्यात आली आहे.

 कृषी विकास अधिकारी कार्यालयाची भूमिका : कृषी विकास अधिका-यांनी जिल्ह्यातील प्रमुख वृत्तपत्रामध्ये योजनेंतर्गत शेतक-यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात

 देणा-या बाबी आणि त्याकरीता मिळणारे अनुदान याच्या सविस्तर तपशीलासह जिल्हास्तरावरुन व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन योजनेंतर्गत निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनुज्ञेय अनुदान उपलब्ध करुन देण्याकरीता कृषी विकास अधिका-यांनी लाभार्थी यादी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना मंजुरीकरीता पाठवावी. अशा शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्राधान्याने अनुदान उपलब्ध करुन द्यावे.

 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची भूमिका : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना(क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन योजनेंतर्गत 2019-20  या वर्षातील अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना प्रथमतः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेंतर्गत लाभ देणे अपेक्षित  असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्राधान्याने मंजुरी देऊन त्यांना अनुज्ञेय अनुदान उपलब्ध करुन द्यावे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेतंतर्गत 2019-20 मध्ये ई-ठिबक प्रणालीद्वारे अनुसूचीत जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्ज केलेल्या लाभार्थी प्रस्तावांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अनुदान परिगणना करुन शिफारस करण्यात आलेल्या प्रस्तावांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्राधान्याने मंजुरी देऊन त्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे. याचप्रमाणे त्यांनी अनुदान वर्ग केलेल्या लाभार्थ्यांची यादी कृषी विकास अधिकाऱ्यांना पाठवावी जेणेकरुन या लाभार्थ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत पुरक अनुदानाची रक्कम अदा करणे शक्य होईल. राज्यातील अनुसूचित जाती, नवबौध्द आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या योजनेंतर्गत अधिकाधिक सहभाग वाढविणे व लाभ देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

 
Top