उस्मानाबाद/ प्रतिनिधी

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये 2021-22मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी दारिद्र रेषेखालील असेल तर त्यासंबंधीच्या यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा.इयत्ता पाहिलीतील प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांचे वय पाच वर्ष पूर्ण असावी.तसेच इयत्ता दुसरीच्या प्रवेशाकरीता विद्यार्थ्याकडे इयत्ता पाहिलीचा शाळा सोडल्याचा दाखला असावा.विद्यार्थ्यांच्या जन्म तारखेसाठी ग्रामसेवक अथवा अंगणवाडीचा दाखला जोडण्यात यावा,या प्रवेशासाठी अर्ज करावेत,असे आवाहन सोलापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी  शुभांगी कांबळे यांनी केले आहे.

 पाहिली आणि दुसरी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्याची जाहीर सुचनेद्वारे माहिती मागवून पालकांनी नजीकच्या प्रत्येक शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांमार्फत विशिष्ट कालावधीत नाव नोंदणी करावी किंवा सोलापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी या कार्यालयास संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.

 या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्याच्या पालकांनी संमतीपत्र आणि शाळेत प्रवेशासाठी अर्जही द्यावा. तसेच अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला,उत्पन्नाचा दाखला आणि रेशनकार्ड आदी कागदपत्रे अर्जासोबत द्यावेत.अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच अपंग/विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्त्या आणि दारिद्र रेषेखालील कुटुंबातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याची प्राधान्याने निवड करुन त्यांना नामाकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल.

 विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/ निमशासकीय नोकरदार नसावेत आणि खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या आणि पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. रुपये एक लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा आणि सक्षम अधिका-यांचे जातीचे प्रमाणपत्रअसलेल्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कार्यालयास दि.19 फेब्रुवारी-2021 पासून आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.तसेच संपर्काकरिता विशाल सरतापे,प्रभारी सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण), मोबाईल नंबर 8668774254 यांच्याशी संपर्क साधावा.विद्यार्थी आणि पालकांवरती अटी,शर्ती आणि नियम बंधनकारक राहतील.असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक यांनी केले आहे.


 
Top