उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी जनता पार्टीचे श्री प्रविण प्रभाकर पाठक यांची आज एकमताने निवड झाली उस्मानाबाद नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी  झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

उस्मानाबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रवीण पाठक यांच्या निवडीला समर्थन दिले भारतीय जनता पार्टी  यांनी श्री प्रवीण पाठक यांच्या निवडीचा ठराव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता भारतीय जनता पार्टीचे गटनेते सौ राणी  दाजी आप्पा पवार यांनी श्री प्रवीण पाठक यांच्या निवडीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे तसेच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या कडे दाखल केला होता त्यानुसार आज सर्वसाधारण सभेने या ठरावाला मान्यता दिली. या नंतर तहसीलदार गणेश माळी यांनी कोरोना संदर्भात माहीती दिली.

यावेळी शिवाजी पंगडवाले सिध्देश्वर कोळी युवराज नळेयांनी काही प्रश्न  विचारुन प्रविण पाठकचे अभिनंदन  केले

 
Top