तुळजापूर  / प्रतिनिधी : - 

तालुक्यातील जळकोट जिल्हापरिषद  मतदार संघातील खालील गावांन मधील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने तरी या रस्तांच्या दुरुस्ती साठी तात्काळ निधी देण्याची मागणी जळकोट चे जिपसदस्य तथा माजी पंचायत समिती सभापती प्रकाश चव्हाण यांनी जिल्हाअधिकारी यांच्या कडे पञ देवुन मागणी केली आहे.

जिपसदस्य प्रकाश चव्हाण यांनी आपल्या पञात म्हटलं आहेकि  जळकोट ते मानेवाडी जळकोट ते सलगरा मड्डी मुर्टा पाटी ते होर्टी हे रस्ते खराब झाल्याने त्यामुळे या मार्गवरुन प्रवास करणाऱ्या लोकांचे हाल होवुन  अपघात होत आहेत तरी या रस्ताचे डांबरीकरण करण्यासाठी तात्काळ विकास निधी देण्यासाठी आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्याची मागणी चे पञ जिल्हाअधिकारी मुख्यकार्यकारीअधिकारी कार्यकारी अभियंता सा बां विभाग उस्मानाबाद यांना दिले आहे.

 
Top