उमरगा / प्रतिनिधी

 भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने  शहरातील नगरपरिषदेच्या समोर  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी सोनबा येलवे पाणपोईचे उदघाटन  महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे यांच्या हस्ते शनिवारी दि 20 रोजी करण्यात आले.

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी  20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष केला  बहुजनांसाठी चवदार तळे खुले केले यातुन मानवी हक्क आणि अधिकार मिळवुन दिला. या क्रांती दिनाचे औचित्य साधून अँड महादेव ढोणे यांच्या सहकार्यातुन चालु करण्यात आलेल्या  पानपोईचे उदघाटन करण्यात आले.या वेळी तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे यांची उपस्थिती होती. 

 कार्यक्रमास अश्विनीताई कांबळे, कविता सुरवसे, रंजना सुरवसे,दिलीप गायकवाड, प्रभाकर गायकवाड,जिवनराव सुर्यवंशी, अविनाश भालेराव ,राजेंद्र सुर्यवंशी,किरण कांबळे, शेखर कांबळे,,समता सैनिक दलाचे नवनाथ गायकवाड आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय कांबळे  यांनी केले तर आभार निखिल गायकवाड यांनी मानले.


 
Top