तेर / प्रतिनिधी

महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान (उमेद )च्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील महिलांना भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून शेळीपालन प्रशिक्षण देण्यात आले.

खेड गावातील 40 महिलांना उत्पादक गटाच्या स्थापनेसाठी प्राथमिक स्वरुपात आधुनिक व मोठ्या पद्धतीने शेळीपालन विषयी पोषण व संगोपन करता यावे या उद्देशाने दहा दिवसाचे प्रशिक्षण उमेद व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत तज्ज्ञ व प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये महिलांना बंदिस्त शेळीपालन तसेच शेळ्यांच्या विविध जाती विषयी आणि संगोपन विषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले .या प्रशिक्षणाचे आयोजन तेर प्रभागाचे प्रभाग समन्वयक राम अंकुलगे यांनी केले तर हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रेरिका विजया गरड, संगीता टकले, साधना गरड यांनी परिश्रम घेतले.

 
Top