तुळजापूर / प्रतिनिधी :- 

तालुक्यतील गोंधळवाडी येथील  महादेव शिवराम मोटे यांच्या गावात लगत जमीनितील  राहत्या कुडाच्या छपराच्या पत्र्याच्या घराला अचानक आग लागुन   संसारपयोगी साहित्य रोखरकमे सह दीड लाख रुपयाचे नुकसान झाले. हे कुंटुंब ज्वारी काढण्यासाठी दुसऱ्याचा शेतात गेले असता अचानक शनिवार दि. २०रोजी सकाळी दहा वाजता आग लागली होती.

  या  बाबतीत अधिक माहीती अशी की, गोंधळवाडी ता. तुळजापूर येथील महादेव मोटे यांच्या शेतातील कुड व पञ्याचे घरास अचानक आग लागुन यात , दोन शेळीचे पिल्ले, कारवानी कुत्रे ,यामध्ये संसार उपयोगी सर्व भांडे, कडधान्य डाळी, दोन पोते गहु ,पाच पोते ज्वारी, दररोज घ्यायचे कपडे नवीन व जुने, पिक पंप फवारे, घरामधील सर्व ग्रह उपयोगी उपयोगी वस्तू ,सिगडी गॅसची, पाच तोळे सोने, रोख रक्कम वीस हजार रुपये, घरातील जमिनीचे व इतर महत्त्वाचे कागदपत्रे, घरातील महिलांनी बचत म्हणून केलेली गल्ल्यांमध्ये असणारी रक्कम अंदाजे पाच ते सात हजार रुपये, दीड लाख रुपये नुकसान  झालेले आहे, 


 
Top