तुळजापूर/  प्रतिनिधी :-

तालुक्यातील सिंदफळ येथे फेसबुकवर खुन्नसचे स्टेटस का ठेवले असे म्हणुन भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर  तलवारीने जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची दि.२8 मार्च रोजी सांयकाळी ही घटना घडली यात तुळजापूर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा नोंद.

याबाबत अधिक माहिती अशी आहे. की,तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील  सुहास राजेंद्र मिसाळ, मारुती उर्फ अक्षय तुकाराम मिसाळ ,अशोक मिसाळ ,विशाल सुनिल मिसाळ, विश्वजीत नवगिरे ,संदीप उर्फ पप्पु मिसाळ सर्वरा.सिंदफळ तरदिपक जगताप,गणेश गंधोरे व इतर दोन ते तिन अनोळखी सर्व रा.तुळजापुर यांनी फेसबुकवर खुन्नसचे स्टेटस का ठेवले असे म्हणुन भांडणाची कुरापत काढून घरात घुसुन तक्रारदाराच्या  मुलास शिवीगाळ करुन त्याची गच्ची पकडुन घराबाहेर ओडत आणुन आरोपी सुहास राजेंद्र मिसाळ याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने तक्रारदाराचा मुलगा धनाजी याचे उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारुन जखमी केले गणेश गंधोरे याने लाथाबुक्याने मारहाण केले .आरोपी सुहास मिसाळ याने त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तक्रारदाराच्या डोक्यात पाठीमागुन मारुन जखमी केले त्यावेळी तक्रारदार खाली पडला असताशिवीगाळ करण्यास सुरुवात केली .

 विशाल मिसाळ गणेश गंधोरे व इतर सर्वानी तक्रारदारास व तक्रारदाराच्या मुलगा सचिन,धनाजी यांना लाथाबुक्याने मारहाण केली .अशी तक्रार पोलीस स्टेशन तुळजापूर येथे शिवाजी शिवराम व्यवहारे यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर वरील आरोपीविरुद्ध भा .द.वी 307,452,324,323,504,143,147,148,149,188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चनशेट्टी करत आहेत .याबाबत तुळजापूर पोलिसांनी वरील आठ आरोपींपैकी सहा आरोपी ताब्यात घेतले आहेत .दोन आरोपी फरार सहा आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.

 
Top