उस्मानाबाद/  प्रतिनिधी :-

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्याकरीता शासनाने शासकीय कार्यालयात 50 टक्के उपस्थिती जाहीर केलेनुसार जिल्हयातील सर्व माजी सैनिक,युध्द विधवा,विधवा,अवलंबितांना त्यांनी पुढील प्रमाणे तालुका निहाय नमूद दिवशी कार्यालयीन वेळेत (स. 9.45 ते सांय. 6.15) व शासकीय सुटटीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजासाठी यावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उस्मानाबाद यानी  केले आहे.

तालुका आणि कामकाजाचे दिवस पुढीलप्रमाणे आहेत-

कळंब व लोहारा- सोमवार, उमरगा व भूम- मंगळवार, परंडा व तुळजापूर- बुधवार, वाशी व उस्मानाबाद-गुरूवार, सर्व तालुके अत्यावश्यक कामासाठी पुर्व परवानगीने-शुक्रवार. अत्यावश्यक कामाकरीता येण्यासाठी खालील नमूद दूरध्वनी-02472 222557,भ्रमणध्वनी-7588527554 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून पुर्व परवानगी घेण्यात यावी.

 
Top