उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जि.प.च्या महिला व बाल विकास विभाग व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिलकुमार नवाळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. रत्नमाला पंडितराव टेकाळे, पंचायत समितीच्या सभापती सौ.हेमा चांदणे, कार्यकारी अभियंता सौ.सुनिता पाटील, श्रीमती कुंभार, कृषी विकास अधिकारी टी.जी.चिमणशेटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एन.बी.आघाव आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा परिविक्षा अधिकारी ए.बी.शेळके, विधी अधिकारी एस.जी.पाटील, परिविक्षा अधिकारी एन.डी.इरकल, एस.आर.तोरकड आणि बी.डी.भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यात विशेष योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

 श्रीमती अस्मिताताई कांबळे यांनी मुलगा-मुलगी भेदभाव न करता स्त्रियांचा समाजाने आदर केला पाहिजे. तसेच महिलांनीही त्या महिला असल्याचा अभिमान बाळगायला हवा असे सांगितले. कारण समाज हा स्त्री शिवाय पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून स्त्रीला अनन्य साधारण महत्व असल्याचेही त्या म्हणाल्या.

 या कार्यक्रमात जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) बी.एच.निपाणीकर यांनी महिला व बाल कल्याण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या महिला विषयक उपक्रम आणि योजनांची माहिती दिली.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी केले. यावेळी श्रीमती अस्मिताताई कांबळे यांनी महाराष्ट्रात प्रथमच ‘सेव्ह द बर्ड’ या उपक्रमाची विभागातर्फे संकल्पना मांडून प्रत्यक्ष कृतीस प्रारंभ केल्याप्रित्यर्थ विभागाची प्रशंसा केली.

 
Top