तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त  आलियाबाद ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा तसेच बचतगटाच्या माध्यमातून, व्यवसाय, उद्योग व कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.

 यावेळी, सरपंच ज्योतीका प्रकाश चव्हाण, ग्रा.प.सदस्या रेखा चव्हाण,घमाबाई राठोड,शानुबाई पवार, राजश्री चव्हाण, निर्मला राठोड, शांताबाई चव्हाण,रंजना राठोड, इंदू राठोड,‌सुरताबाई चव्हाण, मंगल चव्हाण,इंदूमती राठोड, सुनीता चव्हाण,शानुबाई चव्हाण,रेषमा चव्हाण, रिना चव्हाण, गुणाबाई राठोड, हॅलो मेडिकलच्या सुपरवाझर, कार्यकर्ती यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास माजी नायब तहसीलदार माणिक चव्हाण, अमृता चव्हाण, रामचंद्र पवार,थावरु राठोड, ताराचंद राठोड, संजय चव्हाण, शिवाजी चव्हाण, गोविंद जाधव, रतन चव्हाण यांच्या सह ग्रामस्त उपस्थित होते.कार्यकमाचे सुत्रसंचालन शरद सुर्यवंशी यांनी केले.

 
Top