कळंब / प्रतिनिधी-

येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण कल्याण समिती ची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 यावेळी रुग्णांच्या समस्या विषयावर चर्चा करून उपाययोजना सुचविण्यात आल्या. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना टेस्ट वाढविणे संदर्भात चर्चा होवून खाजगी हॉस्पिटल्समध्ये कोविड टेस्टींग ला परवानगी देणे व कोविड लसीकरणासाठी खाजगी हॉस्पिटल ची मदत घेण्या संदर्भात चर्चा केली व वरील दोन्ही ही गोष्टी लवकरच अमलात आणणे साठी च्या उपाय योजना हाती घेण्यात येतील असे डॉ पाटील यांनी सांगितले. तसेच कळंब येथे ट्रॉमा केअर सेंटर, वाढीव खाटांचे रुग्णालय लवकरच कार्यान्वित करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील असे पाटील म्हणाले. 

या वेळी डॉ पाटील यांचा आय एम ए च्या महाराष्ट्र राज्य शाखे तर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त महिला डॉक्टर्स डॉ शोभा वायदंडे, डॉ भक्ती गिते, डॉ मंजश्री शेळके, डॉ मिरा दशरथ, एस डी एम अहिल्या गाठाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी सांगळे मॅडम, सिस्टर श्रीमती शैलजा वाघमारे, श्रीमती गोसावी, श्रीमती गोरे आदिंचा प्रशस्तीपत्र व पुस्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

बैठक यशस्वी करण्यासाठी डॉ जिवन वायदंडे, डॉ पुरूषोत्तम पाटील, डॉ निलेश भालेराव, डॉ सुधीर औटी, परशुराम कोळी, आदींनी परिश्रम घेतले.


 
Top