तेर / प्रतिनिधी:

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती न अभियान अंतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महा समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राज्यात राबविण्यात येत आहे .या अभियानामुळे महिला आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार आहे अशी माहिती तेर समन्वयक राम अंकूलगे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती  अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून 8 मार्च ते 5 जून 2021 दरम्यान कालबद्ध पद्धतीने महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यातील ग्रामीण महिलांना स्वयं साहाय्यता सम्रु हाद्वारे संघटित करणे व ग्राम संघ आणि प्रभाग संघ यांच्या माध्यमातून महीला़चे संघटन अधिक मजबूत करणे,सर्व महिलांनी दशसूत्री द्वारे संघटना बरोबर आरोग्य ,पोषण ,स्वच्छता, शिक्षण, जीवन कौशल्य याबाबत माहिती व प्रशिक्षणाद्वारे क्षमता बांधणी करणे, शासनाच्या योजनांची माहिती महिलांना देऊन  त्यांना शासकीय सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणे,महिलांना आर्थिक सामाजिक सर्वांगीण विकासाला चालना देऊन त्यांना गावाच्या विकासात सहभागी करून मुख्य प्रवाहात आणणे, या योजनेसाठी शासनाच्या सर्व संबंधित विभागाबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकास सक्रिय सहभागी करून महिला सक्षमीकरणाची एक लोक चळवळ उभी करणे हा महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान चा मुख्य उद्देश आहे.

 
Top