तेर (प्रतिनिधी) 

उस्मानाबाद जिल्ह्यातील  ढोकी येथे १४ मार्चला दुपारी  महावितरण कार्यालय समोरील ग्रामपंचायतच्या दहा गाळयात अचानक शार्टसर्किटने आग लागुन आठ दुकाने व दुकानातील साहित्य जळुन खाक झाले.या आगीत जवळपास 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 ढोकी येथे राज्य महामार्ग ७७जवळील ग्रामपंचायतीच्या गट क्रं१६मध्ये आसणारे व्यावसायिक दुकाने आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जनता कर्फ्यु आसल्याने सर्व दुकाने बंद होती आज दुपारी दोन वाजन्याच्या सुमारास आचानक लागलेल्या आगीत आठ दुकाने भस्मसात झाली .यामध्ये रफिक महेमुद सय्यद यांचे सायकल दुकान व प्लास्टिक सेंटरचे आंदाजे नुकसान दीड लाख रुपये., अब्रार कागदी किसान अँग्रो यांचे तेरा लाख रू,.गोविंद जाधव गोविंद कलेक्षण नऊ लाख रुपये. ,ऋषीकेश कावळे आटोमबाईल नऊ लाख रुपये,. दयानंद कावळे .तुळजाई एम्पोरियम.तीन लाख रुपये. ,  आमोल गायकवाड सम्रध्दी आँनलाईन तीस हजार रुपये,. प्रकाश गुरव प्रकाश ईलेक्ट्रीकल्स सत्तर हजार .,हुसेन मशायक मेट्रो टेलर  दिड लाख रुपये. ,नावेद शेख रजा ईलेक्ट्रीकल्स दिड लाख रुपये. नवनाथ समुद्रे हारिओम फुटवेअयर तीन लाख रुपये ,आसे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले .या दुकानास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले या ठिकाणी आग लागल्याचे दिसताचआजमेरा यांचे टँकर डायवर . महादेव हिंगे यानी घटनास्थळी टँकर उभा करुन आग   आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.पंरतू प्रयत्न अयशस्वी ठरले. या ठिकाणी अग्निशामक ची गाडी वेळेवर पोचली नाही.तसेच या ठिकाणी असणारे एम.एस.सी.बी चे कर्मचारी आमोल बनसोडे, दत्ता डाळे,तानाजी रोडे,दिपक ताटे अमर गवळी,ताबोंळी यांनी सुरुवातीला आग विजवण्याचा प्रयत्न केला. सर्व गावकर्यानी घटनास्थळाकडे धाव घेऊन ती आग विजवण्याचा प्रयत्न केला.

या लागलेल्या आगीची घटना समजताच आ.राणाजगजितसिंह पाटील व आ. कैलास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

 
Top