उस्मानाबाद / प्रतिनिधी:

पोलिस दलाच्या वतीने शनिवारी (दि.१३) जिल्हाभरात अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात पाच कारवाया करून पाच जणांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

यामध्ये भूम शहरातील कसबा येथील विठ्ठल विश्वनाथ माळी हे भूम एमआयडीसी परिसरातील रानवारा ढाब्यात देशी दारुच्या २० बाटल्या अवैधपणे बाळगल्या असतांना भूम पोलिसांना आढळले. उस्मानाबाद येथील ज्योती मारुती शिंदे या शहरातील शासकीय विश्रामगृहामागे १५ लिटर गावठी दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे आनंदनगर पोलिसांना आढळल्या. तसेच बुकनवाडी येथील श्रीपती शिवराम काळे हे राहत्या घरासमोर १० लिटर गावठी दारू तर सुनील जमादार (रा. कोंड) हे गावातील चायनीज खानावळीच्या बाजूस १५ लिटर गावठी दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याचे ढोकी पोलिसांना आढळले. तसेच परंडा तालुक्यातील कंडारी येथील भैरवनाथ अदिनाथ बनसोडे हे गावातील प्रेम ढाबा येथे देशी दारुच्या १५ बाटल्या अवैधपणे बाळगल्याचे आंबी पोलिसांना आढळले. त्यांच्याविरुध्द संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top