उस्मानाबाद/ प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे विलनीकरण एसबीआय मध्ये झाल्यापासून उस्मानाबाद शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत ग्राहकांची सेवा मात्र राम भरोसे झाली आहे. 

सध्या ऑनलाईन चा जमाना असल्यामुळे बऱ्याच सेवा फोन पै , गगुल पै व अन्य सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यात येत आहे. परंतू त्यासाठी मात्र खात्यामध्ये पैसे असने महत्वाचे आहे. शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत चेक जमा केल्यानंतर तब्बल ८ ते १५ दिवस चेक जमा करण्यास विलंब लागत आहे. विशेष म्हणजे अनेकजण चेक जमा २ ते ३ दिवसात होईल, या अपेक्षेने इतर प्लॅन आखतात. परंतू चेक जमा न झाल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या संदर्भात बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता कधी कर्मचारी कमी तर कधी सिस्टम बंद असल्याचे सांगितले जाते. या एकंदर कारबारावरून एसबीआयच्या बँक ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सर्वत्र अत्याधुनिक सुविधांचा वापर होत असताना ही एसबीआय  बँक ग्राहक सेवेकडे का दुर्लक्ष करत आहे ? का ग्राहकांना वेठीस धरले जात आहे? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

मुख्य शाखेत नेहमीच गोंधळाची स्थिती

उस्मानाबाद शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत नेहमीच गोंधळाची स्थिती पाहायला मिळले. मुख्य शाखेचे नुतनीकरण करण्याचे काम गेल्या ५ ते ६ वर्षांपासून चालू आहे. परंतू आज ही या बँकेत नुतनीकरणाचे काम चालू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कांही कामचुकार कर्मचाऱ्यांना फर्नीचरचे काम चालू असल्यामुळे वायरींग कट झाली आहे, त्यामुळे सेवा बंद आहे, अशा प्रकारे सांगण्यात येते. ग्राहकांना सेवा मिळो ना मिळो अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार फिक्स असल्याने त्यांना त्यांचे कोणतेच दुख नसते. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार कोरोना लॉकडाऊनच्या काळात बँकेची ग्राहकसेवा बंद होती त्या काळात बँकेचे नुतनीकरण का केले नाही ? किंवा फर्नीचर व वायरींगचे कामे का होऊ शकले नाहीत ? याचे उत्तर वरिष्ठांनी दयावे, अशी बँक ग्राहकांची अपेक्षा आहे. 

माफीचा मेल

उस्मानाबाद शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी मुकेश नायगावकर यांनी बँकेच्या कामकाजाविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या ८ महिन्यापासून एसबीआयमध्ये संयुक्त खाते काढण्यासाठी २ ते ३ वेळेस कागदपत्रे दिली. परंतू प्रत्येकवेळेस कागद सापडत नाहीत, वायरींग कट झाल्यामुळे सिस्टीम बंद आहे अशा प्रकारे उत्तरे मिळत गेली. अाखेर यूनो मध्ये खाते काढून घेतले, असे सांगून नायगावकर यांनी गेल्या ५ ते ६ वर्षापूर्वी उस्मानाबाद एसबीआयच्या शाखे विषयी मी केलेल्या तक्रारीमुळे एसबीआयच्या मुख्य अरूणधाती भट्टाचार्य यांनी आपल्याला मेल द्वारे दिलगीरी व्यक्त केली होती, असे सांगितले. 

सिस्टीम ही नही चलती क्या करे ? 

उस्मानाबाद एसबीआयच्या मुख्य शाखेतील सिटीएस मशीन बंद असल्यामुळे चेक क्लियरन्स गेल्या २२ तारखेपासून बंद आहे, असे सांगून बँकेची कामाची गती वाढण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे व्यवस्थापक आशिषकुमार श्रीवास्तव यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

 
Top